सांस्कृतिक
सांस्कृतिक विभागातील सर्व ताज्या घडामोडी
दर्शनासाठी आधी नोंदणी करा! भीमाशंकरमध्ये ऑनलाइन पास अनिवार्य
श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थानाने दर्शन व्यवस्थेत मोठा बदल करत भाविकांसाठी नवीन नियम लागू केला आहे. यापुढे मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला ऑनलाइन नोंदणी करून पास घेणे बंधनकारक राहणार आहे. ऑनलाइन पास नसलेल्या भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर मंदिरात दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. विशेषतः श्रावण महिना, महाशिवरात्री, सोमवार आणि सुट्ट्यांच्या दिवशी मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. या वाढत्या गर्दीचे नियोजन, सुरक्षेची काळजी आणि भाविकांना सुलभ दर्शन मिळावे यासाठी ही नवीन व्यवस्था लागू करण्यात आली आहे.देवस्थान प्रशासनाच्या माहितीनुसार, दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी अधिकृत ऑनलाइन प्रणालीद्वारे आगाऊ नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर भाविकांना निश्चित वेळेचा पास दिला...
सविस्तर वाचा